कोकण

कमी पटसंख्येच्या पाच शाळांना फटका

CD

कमी पटसंख्येच्या
पाच शाळांना फटका

दोडामार्गची स्थिती; नव्या जीआरला विरोध

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३ : शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या जीआरचा फटका तालुक्यातील पाच माध्यमिक शाळांना बसला आहे. यात झोळंबे, आयी, घोटगेवाडी, उसप, मांगेली या गावांतील माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेत समाविष्ट करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाने काढलेला हा अन्यायकारक जीआर रद्द न केल्यास व्यापक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी दिला आहे.
श्री. गवस यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा जीआर पारित केला आहे. हा जीआर दुर्गम भागातील शाळांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. या जीआरचा फटका दोडामार्ग तालुक्यातील पाच शाळांना बसला आहे. यात झोळंबे, आयी, घोटगेवाडी, उसप, मांगेली या गावांतील माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शासनाच्या जीआरनुसार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून या पाचही शाळा बंद कराव्यात, तसेच त्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य जवळच्या शाळेत समाविष्ट करावे, असा आदेश तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ससेहोलपट होणार असून त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे कायमस्वरुपी बंद होणार आहेत. त्यासंदर्भात दोडामार्ग तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक गवस, बाळा धाऊसकर, रॉकी फर्नांडिस आदी उपस्थित होते; मात्र गटशिक्षणाधिकारी कामानिमित्त कुडाळ येथे गेल्याने भेट होऊ शकली नाही. कार्यालयात उपस्थित कर्मचारी श्री. शेट्ये यांनी संबंधित आदेश आपल्या कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी नदाफ यांच्याशी फोनवर चर्चा केली.
...............
‘शक्तिपीठ’ रद्द करा; शिक्षण क्षेत्रास निधी द्या
शासनाच्या तिजोरीत खडखडाट असेल तर जनतेला नको असलेले ‘शक्तिपीठ’सारखे प्रकल्प रद्द करून शिक्षण क्षेत्रासाठी वाढीव निधी द्यावा. शासनाने लादलेला अन्यायकारक जीआर रद्द न केल्यास तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन व्यापक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा श्री. गवस यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT