कोकण

ज्येष्ठ नागरिक संघाची सावंतवाडीत उद्या सभा

CD

ज्येष्ठ नागरिक संघाची
सावंतवाडीत उद्या सभा
सावंतवाडीः येथील तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवारी (ता. ६) सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा-सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी इनरव्हील क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ यांचा ज्येष्ठांसाठी उपयुक्त असा संयुक्त उपक्रम पार पडणार आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
..................
‘समाज कल्याण’तर्फे
जिल्हा निबंध स्पर्धा
मालवण : समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्यावतीने ‘घर घर संविधान’ या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन गटासाठी ‘भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार’ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्ये, अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाहीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी निबंधाची मर्यादा ७०० ते ८०० शब्द इतकी ठेवली आहे. निबंध स्वतः लिहिलेला असावा. विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला निबंध ११ डिसेंबरपर्यंत बार्टी समतादूत सुजित जाधव यांच्याकडे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, बार्टी प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.
.....................
साळिस्तेत रविवारी
भूमिपूजन सोहळा
तळेरे : साळिस्ते रांबाडेवाडी येथील श्री महापुरुष देवस्थान मंदिराचा भूमिपूजन सोहळा रविवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महापुरुष देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात प्रसिध्द असून दरवर्षी मेमध्ये वार्षिक उत्सव साजरा केला जातो. मुंबई स्थित सर्व चाकरमानी व ग्रामस्थांनी भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................
सुभाष राणेंकडून
५० हजारांची देणगी
कुडाळः वाडोस हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुभाष राणे (रा. माजगाव, ता. सावंतवाडी) यांनी झाराप येथील दिव्यांगांच्या विशेष शाळेस २० हजार, संदीप परब यांच्या ''आनंदाश्रम'' या अनाथ वृद्धाश्रमास ३० हजार अशी एकूण ५० हजारांची देणगी दिली. श्री. राणे अडचणीत असताना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शाळा संघाने त्यांना आर्थिक मदत केली होती. संघाने ती परत करण्याचा आग्रह धरला नव्हता; मात्र कृतज्ञतेपोटी राणे यांनी ही रक्कम दोन सामाजिक संस्थांना देऊन आपला मान राखला आहे. राणे हे कपडे, धान्य अशा विविध माध्यमातून सामाजिक कार्यात नियमितपणे योगदान देत असतात. संघाने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
.......................
''सागरी महामार्गाची
तत्काळ दुरुस्ती करा''
कुडाळः चिपी-सिंधुदुर्ग विमानतळाकडे जाणाऱ्या रेडी-रेवस सागरी महामार्गावरील केळुस ते पाट या दरम्यानच्या राज्यमार्गावर पूर्णपणे खड्डे पडल्याने तो रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वार, रिक्षा व मोटारचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गोव्याहून मालवणकडे येणाऱ्या तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सागरी महामार्गाची पाट ते वेंगुर्लेदरम्यान दुरवस्था झाल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे निकामी झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांतून होत आहे.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT