swt420.jpg
08464
डॉ. जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी शहरात ‘बाहुबली संस्कृती’ रुजतेय
डॉ. जयेंद्र परुळेकरः भविष्यात गंभीर परिणाम दिसतील
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः जिल्ह्यातील शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीचे स्वरूप बदलून ते आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एखाद्या गाववजा शहरासारखे होत आहे. येथील पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘बाहुबली संस्कृतीची’ सुरुवात झाली आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
डॉ. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यात असे म्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या येथील पालिकेच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला लागलेले गालबोट आणि निर्माण झालेला तमाशा पाहता हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमानच आहे. या निवडणुकीमुळे शांत, सुसंस्कृत सावंतवाडीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संस्कृतीप्रमाणे बाहुबली संस्कृतीची सुरुवात झाल्याचे दिसून आले. भूमाफिया आणि अंमली पदार्थ तस्करी करणारे बाहुबली गेली अनेक दशके तेथे राजकारणात सक्रिय होतेच, पण आता सावंतवाडीत देखील या संस्कृतीची नांदी अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम या ठिकाणी दिसून येणार आहेत. हळूहळू येथील युवकांकडे बंदुक (रिव्हॉल्व्हर्स) दिसू लागतील आणि खून देखील झाले तर आश्चर्य वाटायला नको. केवळ १९,५०० मतदार संख्या असलेल्या ''क'' श्रेणीच्या पालिकेच्या निवडणुकीसाठी एखाद्या पक्षाकडून मतदारांना अवैधरितीने वाटण्यासाठी २० ते २५ कोटी रुपये आणले जातात, तेव्हा येनकेन रितीने सत्ता हस्तगत करून पुढील पाच वर्षांत दोनशे-अडीचशे कोटी लुटण्याचा कुटील डाव त्यामागे असतो हे निश्चित. त्यामुळे आता खरा खेळ सुरू होईल आणि सावंतवाडीतील सामान्य जनतेला तो बघत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.