-rat५p७.jpg-
२५O०८५८०
मंडणगड : जनजागृती रॅलीमध्ये सहभागी मान्यवर व विद्यार्थी.
---
मंडणगडमध्ये जनजागृती फेरी
मंडणगड, ता. ५ ः येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन शिक्षण व विस्तार विभागच्यावतीने संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी एड्स जाणा-एड्स टाळा, मै जवान हूँ-नादान नही। ये है मेरा वादा आज के दिन, एड्स की जानकारी खुशहाल जिंदगी की सवारी। अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे आदी उपस्थित होते.