कोकण

पद्मश्री परशुराम गंगावणेंना राज्य सांस्कृतिक पुरस्कार

CD

08643

पद्मश्री परशुराम गंगावणेंना
राज्य सांस्कृतिक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः कोकणचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे यांना यावर्षीचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभूषण चवरे यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अॅंड आर्ट गॅलरी यांच्या माध्यमातून ठाकर आदिवासी समाजातील पारंपरिक लोककला जपण्याचे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य पद्मश्री गंगावणे करत आहेत. ठाकर आदिवासी कला आंगण अॅंड आर्ट गॅलरीला देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. अनेक शैक्षणिक सहली व निवासी कार्यशाळा या ठिकाणी होतात. श्री. गंगावणे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार, महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सिंधू पर्यटनमित्र पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी समाजासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचान अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT