कोकण

गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये इरा जोशीचे नाव

CD

-rat५p१३.jpg-
P२५O०८६०२
इरा जोशी
------
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये
दहा वर्षाच्या इरा जोशीचे नाव
संगमेश्वर, ता. ५ ः मुंबईतील जोगेश्वरी-मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकल्या इरा जोशी हिने एका मिनिटात (हुलाहूप घुमाव) पायात१७३ वेळा रिंग फिरवण्याचा विक्रम करत आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवले. संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांची इरा नात आहे.
पवई येथील एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. ती कोविडकाळापासून हुलाहूप हा खेळ ऑनलाईन पाहून शिकली. तिला चेन्नई येथील चेन्नई हुपर ट्रेनिंग अॅकॅडमी यांचे मार्गदर्शन लाभले. त्या अॅकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होत तिने या विक्रमाला गवसणी घालत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपले नाव कोरले. ती जोगेश्वरी येथील प्रसिद्ध व्यावसायिक सुभाष सप्रे (वडेवाले) व पत्रकार सुरेश सप्रे यांची नात आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे खासदार रवींद्र वायकर, मनीषा वायकर, विक्रोळी आमदार सुनील राऊत, ज्येष्ठ कामगार नेते बाबा कदम यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती; पगारात केली दुप्पटीने वाढ

Snake Bite : संर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचणार प्राण; ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट’ ठरणार जीवरक्षक

SCROLL FOR NEXT