कोकण

निधी संकलन

CD

सशस्त्र सेना ध्वजदिन
निमित्त निधी संकलन
पावस ः सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ व ध्वजदिन २०२४ चे उत्कृष्ट संकलन करणाऱ्या संस्था/कार्यालये यांचा बक्षीस वितरण समारंभ ९ डिसेंबरला सकाळी ११ वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, एअर मार्शल (निवृत्त) एच. एन. भागवत, शिक्षणाधिकारी किरण लोहार, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योगकेंद्र अजिंक्य आजगेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

लांजा येथे उद्या
रक्तदान शिबिर
पावस ः लांजा शहरातील शिवगंध प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. ७) सकाळी ७.३० ते दुपारी १ या वेळेत संकल्प सिद्धी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रक्तपेढीतील असणारा रक्ताचा तुटवडा आणि रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन शिवगंध प्रतिष्ठानने अद्वैत प्रकाश जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन शिवगंध प्रतिष्ठानने केले आहे.


जिल्हा कबड्डी संघात
गौरीज सणस
दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथील (कै.) अण्णासाहेब बेहेरे कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थी व अमर भारत क्रीडामंडळाचा खेळाडू गौरीज सणस याची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. सलग चौथ्या वर्षी राज्यपातळीवर खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ मैदानावर ५२वी कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा तसेच दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या चाचणीतून सुरुवातीला २० संभाव्य खेळाडू निवडण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांच्या सराव शिबिरानंतर अंतिम १४ जणांचा जिल्हा संघ घोषित करण्यात आला. यामध्ये गौरीजने उत्तम कामगिरी करत स्थान निश्चित केले. यापूर्वीही कुमारगटात दोनवेळा तर किशोर गटात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला एकूण चारवेळा राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून दादू सुर्वे (दापोली) व व्यवस्थापक म्हणून प्रथमेश लाले यांची निवड झाली आहे. पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत गौरीज सणस रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Baramati: बारामतीमध्ये विदेशी दारुचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - पनवेल – कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पांतर्गत अडथळे दूर करण्याच्या कामांसाठी विशेष पॉवर ब्लॉक्स

५८ व्या वर्षीही माधुरी दीक्षितची त्वचा इतकी नितळ कशी? मुळीच चुकवत नाही 'या' तीन गोष्टी; म्हणते- सुंदर दिसण्यासाठी...

SCROLL FOR NEXT