गव्हे येथे सेंद्रिय शेतीवर मेळावा
दापोली, ता. ५ ः गव्हे (ता. दापोली) येथे अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सेंद्रिय शेतीसंदर्भातील मार्गदर्शन मेळावा झाला.
मेळाव्याचे उद्घाटन किशोर अमृते आणि सरपंच लक्ष्मण गुरव यांच्या हस्ते रोपांना पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. या वेळी शैला अमृते, सेंद्रिय कृषिभूषण राजेंद्र भट्ट, माजी विस्तार संचालक अशोक निर्बाण, तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त गोमती अमृते, किशोर अमृते व अशिका चाचड आणि परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सेंद्रिय शेतीचे मार्केटिंग, विक्री व्यवस्थापन, प्रमाणपत्र प्रक्रिया याबाबत राजेंद्र भट्ट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
-----