-rat५p१४.jpg -
२५O०८६१८
गीतापठण स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या अश्विनी जोशी व मीरा नाटेकर यांचा गीतामंडळातर्फे सत्कार करण्यात आला
-----
गीता मंडळात गीता जयंती साजरी
रत्नागिरी, ता. ५ : येथील गीता मंडळात ८२वा गीता जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त सुलेखन, पठण, चित्रकला, भक्तीगीत, सूर्यनमस्कार, योगासन, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांचे बक्षीस समारंभ व श्रीमत् भगवद्गीता सामूहिक पठण करण्यात आले. तसे या वेळी श्रीमत् भगवद्गीता पठणावेळी शृंगेरी शंकराचार्य मठ येथील शंकराचार्यांच्या गीतापठण स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या अश्विनी जोशी व मीरा नाटेकर यांचा गीता मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, सुभाष भडभडे, श्रद्धा पत्की यांच्यासह गीता मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मीरा पिलणकर, रेश्मा भाटकर आदी उपस्थित होते.