rat5p21.jpg-
25O08690
रत्नागिरी-राजीवडा किनाऱ्यावर नादुरुस्त आणि बंद पडलेल्या नौका आणि सुट्टे भाग नौकांना ये-जा करण्यासाठी अडथळा ठरत आहेत.
----
‘त्या’ नौकांचा राजीवडा किनारी अडथळा
नूर मच्छीमार संघटनेची मत्स्य व्यवसायसह, सागरी मंडळाकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः शहरातील राजीवडा समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्याचबरोबर किनाऱ्यावर नादुरुस्त आणि बंद पडलेल्या नौका सुट्टे भाग टाकून ठेवले आहेत. यामुळे राजीवडा जेटीवरील नौकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या संदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे, महाराष्ट्र सागरी मंडळाकडे नूर मच्छीमार संघटनेने तक्रार केली आहे; परंतु दोन महिने होऊन देखील त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
राजीवडा जेटीवरून अनेक मच्छीमार नौका मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्रात जाणाऱ्या अशा मच्छीमार नौकांवरील खलाशी, पागी, तांडेलसह इतर कामगारांना रेशन, पाणी, बर्फ, नौकांचे इंधन नेऊन द्यावे लागते; परंतु या मार्गातील किनाऱ्यावर अनेक तुटक्याफुटक्या नौका टाकून ठेवण्यात आल्या असल्याने ही सर्व रसद नौकेत नेताना अडचणीचे होते. त्याचबरोबर मासेमारी करून आलेल्या नौकांवरील मासळी उतरवण्यासही मिळत नाही.
राजीवड्यातील या अडचणीकडे नूर मच्छीमार संघटनेने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र मंडळचे बंदर निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. राजीवड्यातील हबीबुल्ला दर्गाच्या मागे जेटीवर छोट्या मच्छीमार नौका उभ्या करून मासळीची विक्री करतात; परंतु या ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी समुद्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या छोट्या मच्छीमारांची मच्छीविक्री करताना गैरसोय होते. आत्ताच कारवाई झाली नाही तर भविष्यात जेटीवर नौका उभ्या करणेही शक्य होणार नाही, याकडे नूर मच्छीमार संघटनेने आपल्या लेखी तक्रारीतून लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.