कोकण

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण पालकमंत्र्यांसमोर झुकले

CD

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण
पालकमंत्र्यांसमोर झुकले

अरविंद मोंडकर यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : आमदार नीलेश राणे यांच्या समोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना झुकावे लागतेय, ही सिंधुदुर्गमधील सत्ताधारी पक्षासाठी शरमेची बाब आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी पत्रकातून केली आहे.

गेल्या काही वर्षांत सावंतवाडी येथील युवा कार्यकर्ते विशाल परब यांना प्रदेश युवा मोर्चात दिलेले स्थान आणि त्यानंतर नीलेश राणे-रवींद्र चव्हाण यांच्यात सुरू झालेल्या कुरघोडी यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर स्वतः चव्हाण यांनी पुढाकार घेत मुंबईत प्रसार माध्यमांना सामोरे जात यावर पडदा टाकला होता. आता नगरपालिका निवडणूक निमित्ताने जिल्ह्यातील निवडणुका लढताना आमदार राणे यांनी भाजपच्या कथित लक्ष्मीदर्शन मोहिमेविरोधात घेतलेली भूमिका पाहता तसेच मालवण, सावंतवाडीमधील भाजपा कार्यकर्त्यांना शिकवलेला धडा पाहता पुन्हा वाद वाढू नये, म्हणून आज चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन स्वतः प्रथम पत्रकार परिषद घेत झालेल्या घडामोडींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चव्हाण यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या अशा भूमिकेवरून हे सिद्ध होत आहे की, त्यांचे राणेंसमोर काही चालणार नाही. सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने सलग दुसऱ्यांदा स्वतःहून प्रसार माध्यमांसमोर जाणे म्हणजे जिल्ह्यातील भाजपला ही शरमेची बाब आहे, असे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

Karnataka CM Siddaramaiah : ‘’सरकार अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार'’ ; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

SCROLL FOR NEXT