कोकण

वेंगुर्लेत शिवसेनेची आज मासिक सभा

CD

वेंगुर्लेत शिवसेनेची आज मासिक सभा
वेंगुर्ले, ता. ६ ः तालुका शिवसेनेची मासिक सभा १२ डिसेंबरऐवजी उद्या (ता. ७) सकाळी १०.३० वाजता सप्तसागर कॉम्लेक्समधील शिवसेना शाखा कार्यालयात होणार आहे. या सभेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत तसेच पक्षीय संघटनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. नुकतीच वेंगुर्ले पालिकेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेच्या ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घराघरांत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. त्यापूर्वीच आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसंदर्भात योग्य रणनीती आखणे व शहर व ग्रामीण भागातील शिवसेना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना तालुका, शहर, महिला आघाडी, युवासेना, सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.
.......................
‘थकबाकी भरा; ५० टक्के सूट मिळवा’
तळेरे, ता. ६ : कासार्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांना ''मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान'' अंतर्गत मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपर्यंत आपल्या नावावर असलेली प्रलंबित घरपट्टी अथवा पाणीपट्टी थकबाकी ग्रामपंचायत कार्यालयात भरल्यास ग्रामस्थांना ५० टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत शासन निर्णय १३ नोव्हेंबरचा शासन निर्णय व शुक्रवारी (ता. ५) ग्रामसभेच्या मंजुरीनुसार लागू करण्यात आली आहे. या विशेष सवलत योजनेअंतर्गत घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरल्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे दोन कचरा कुंडी (डस्टबिन) मोफत देण्यात येणार आहेत. सर्व ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहन कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश तर्फे यांनी केले आहे.
---
ज्युबिलियन क्रॉस
उद्या कुडाळात
कुडाळ, ता. ६ ः येथील डॉन बॉस्को चर्चमध्ये सोमवारी (ता. ८) ज्युबिलियन क्रॉसचे आगमन होणार आहे, अशी माहिती फादर रिचर्ड तसेच पीटर शेराव यांनी दिली. प्रभू येशूने मानव जातीच्या पापांच्या मुक्तीसाठी आपले पवित्र रक्त क्रॉसवर सांडून आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि जगाच्या समस्त लोकांना स्वर्ग प्राप्त करून दिला. म्हणून क्रॉस हा ख्रिस्ती धर्माची पवित्र खुण मानली जाते. येशुच्या बलिदानाच्या स्मरणार्थ जगामध्ये प्रत्येक पंचविसाव्या वर्षी क्रॉस गावागावांत नेला जातो आणि प्रत्येक ख्रिस्ती घरात भेट दिली जाते. कुडाळ चर्चमध्ये सोमवारी या पवित्र क्रॉसचे मिरवणुकीने आगमन होत आहे. या मिरवणुकीत तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन फादर रिचर्ड तसेच पीटर शेराव यांनी केलेले आहे.
--
‘कोमसाप’चे कुडाळात
आज कवी संमेलन
मालवण, ता. ६ ः कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेतर्फे उद्या (ता. ७) सकाळी १०.१५ वाजता को.म.सा.प.चा जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलन कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार मालवणच्या लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ साहित्यकृतीस प्राप्त झाला आहे. यानिमित्त या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप कुडाळ शाखेने केले आहे.
...........................
तळवडे देव काळोबाचा
आज वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे, ता. ६ ः तळवडे-अलीकडील खेरवाडी येथील श्री देव काळोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ७) होत आहे. या जत्रोत्सवात भाविक केळीच्या घडांसह केळी काळोबाला अर्पण करतात. त्यामुळे ‘घडांची जत्रा’ म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. झाडाझुडपामधील रायच्या रुपात नवसाला पावणारा पाठिराखा अशी काळोबा देवाची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर काळोबाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविक गर्दी करतात. रात्री खानोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर मंडळींनी केले आहे.
.....................
कलंबिस्तला उद्या
लिंगेश्वर जत्रोत्सव
सावंतवाडी, ता. ६ ः कलंबिस्त येथील श्री देवी लिंगेश्वर देवस्थान मंदिराची वार्षिक जत्रा सोमवारी (ता. ८) होत आहे. सकाळी पूजा-अर्चा, सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

इंदू मिल स्मारकाबाबत मोठी अपडेट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Mercedes accident Video: भरधाव मर्सिडिज दुभाजकाला धडकून रॉकेटसारखी दोन कार वरून उडाली अन्...

SCROLL FOR NEXT