कोकण

हिंदू जनजागृती समितीतर्फे किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता

CD

08878

हिंदू जनजागृती समितीतर्फे
किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता

मालवण, ता. ६ : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंधुदुर्गवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. या मोहिमेला श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानी माता यांच्या चरणी पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून प्रारंभ करण्यात आला.
किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा, गवत काढून टाकण्यात आले. तसेच काटेरी झाडी तोडण्यात आली. स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली. उपस्थित सर्व शिवप्रेमींनी श्री भवानी देवीचा नामजप केला आणि संपूर्ण किल्ल्याची भ्रमंती केली. या मोहिमेत जिल्ह्यातील ५० शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्थानिक शिवप्रेमी हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा तेजस्वी इतिहास कथन केला. श्री शिवराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि मुख्य पुजारी सयाजी सकपाळ यांचे सहकार्य लाभले. हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली. किल्ल्यावरील व्यावसायिकांनी समितीच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
.....................
08879

माडखोल येथील दिव्यांगास
‘स्वराज्य’ संस्थेकडून मदत

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः ​माडखोल येथील दिव्यांग बांधव अक्षत राणे यांस स्वराज्य दिव्यांग्य संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अक्षत राणे हे १०० टक्के दिव्यांग असून, त्यांना आई-वडिलांचा आधार नाही.
अशा परिस्थितीत त्यांची आजी व सांभाळणाऱ्या व्यक्तींकडून त्यांची काळजी घेतली जात आहे. राणे यांच्या मदतीसाठी स्वराज्य दिव्यांग्य संस्थेतर्फे ही आर्थिक मदत देण्यात आली. ​समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा समाजोपक्रम घेण्यात आला. ​यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील लातये, सचिव कन्हैय्या सांवत, खजिनदार हेमंत राऊळ यांच्यासह सभासद भगवान राणे, शिवाजी राऊळ, दिलीप जाधव, रामचंद्र राणे, शामसुंदर राऊळ, दिलीप माडखोलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT