कोकण

‘भोसले नॉलेज सिटी’मध्ये आयआयटी, मेडिकल अकादमी

CD

‘भोसले नॉलेज सिटी’मध्ये
आयआयटी, मेडिकल अकादमी

अच्युत सावंत-भोसले यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकादमीची सुरुवात करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी विज्ञान शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी सांगितले.
यासाठी कोटा व हैदराबाद येथील नामांकित कोचिंग संस्थांमध्ये कार्यरत, अनुभवसंपन्न शिक्षकवर्ग नियुक्त केले आहेत. प्रभावी अध्यापन, अत्याधुनिक कॉम्प्युटर व सायन्स लॅब, मॅथ्स लॅब, नियमित टेस्ट सीरिज, वैयक्तिक मेंटॉरिंग आदी सुविधांवर भर दिला जाणार आहे. ते म्हणाले की, ‘आतापर्यंत अशा दर्जाचे प्रशिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांकडे जावे लागत होते; मात्र आता वेळ, पैसा व प्रवासाची बचत होऊन सावंतवाडीमध्येच उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधेचीही योजना करण्यात आली आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दहावीतील विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये आयआयटी-जेईई, नीट, करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया व अभ्यास पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अकरावी-बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अच्युत सावंत-भोसले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT