कोकण

बनावट मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांची फसवणूक

CD

बनावट ॲपद्वारे ग्राहकांची फसवणूक
एमआयडीसीतील उद्योजकांची तक्रार ; पाणीबिलाच्या सुविधेचा वापर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीबिल भरण्याच्या ऑनलाईन सुविधेच्या नावाने बनावट ॲपद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार एमआयडीसीकडून चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. खेर्डी एमआयडीसीतील उपअभियंता रविकिरण पिंपळे आणि किशोर हळदणकर यांनी या संदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्राहकांसाठी पाणी देयक भरण्याकरिता अधिकृत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती अधिकृत पोर्टलद्वारे तसेच पाणी देयकावरीलद्वारे उपलब्ध आहे; परंतु चिपळूण औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योजकांना व्यक्ती किंवा संघटना एमआयडीसीच्या नावाने बनावट मोबाईल ॲप तयार करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या बनावट साईट आणि ॲपमध्ये ग्राहकांना बिल भरण्याकरिता आमंत्रित केले जाते, ज्यात त्यांची माहितीची (बॅंकखाते तपशील, ओटीपी, डेबिट-क्रेडिट कार्ड माहिती) चोरी केली जाते. यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक नुकसान झाले आहे तसेच त्यांची गोपनीयता धोक्यात आली आहे. हे स्पष्टपणे सायबर फसवणुकीचे प्रकार आहेत.
ग्राहकांना बनावट ई-मेल एसएमएसद्वारे लिंक पाठवले जात आहे ज्यामध्ये एमआयडीसीचा लोगो, डिझाईनचा वापर केला जात आहे. व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे ग्राहकांना नळ कनेक्शन बंद करण्याबाबत नोटीस पाठवली जात आहे. उद्योजकांचे नेमके किती पैसे ऑनलाईन चोरण्यात आले, याचा आकडा अजून निश्चित नाही; मात्र लोटे, खेर्डी, खडपोली एमआयडीसीतील दहा ते पंधरा उद्योजकांना ऑनलाइन फसवण्यात आले आहे. पोलिसांनी सायबर क्राईमद्वारे उद्योजकांची फसवणूक करणाऱ्या चोरांचा तपास करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT