कोकण

संतोष कुळे जपताहेत लोककला

CD

- rat७p१.jpg-
२५O०८९९२
संतोष कुळे
---
नमन-भारुडचा अष्टपैलू कलाकार
संतोष कुळे ; लोककला क्षेत्रात योगदान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः तालुक्यातील बामणोली येथील कलावंत संतोष कुळे यांनी नमन, भारुड आणि जाखडी या कलेत लहानपणापासून भूमिका साकारत लोककलेचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील लोककलाकार अशीच त्यांची ओळख झालेली आहे.
कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शक्ती तुरा आणि नमन लोककला या कला मोठ्या प्रमाणात सादर केल्या जातात. अशा लोककला म्हणजे मनोरंजनातून समाजात प्रबोधन करण्याचे साधन म्हणून ओळखल्या जातात. अशाच लोककलेत लोककलावंत संतोष उर्फ भाई कुळे यांनी रसिकांची सेवा केली आहे. नमन कलेतून ग्रामीण भाग, शहर आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरातील नाट्यगृहातील रंगमंचावर त्यांनी नमन कलेचे सादरीकरण केले आहे. त्यांनी श्री चंडकाई वाघजाई नमन मंडळ बामणोली, सम्राट बळीराजा नमन मंडळ बामणोली डिंगणकरवाडी या मंडळातून त्यांनी लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि स्वतः अभिनय करत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर शक्ती तुरा कलेत सुद्धा त्यांची तुरेवाला शाहीर म्हणून ओळख आहे. त्यांच्या अभिनयाने रसिक भारावून जात असत. रसिकांना खिळवून ठेवण्याची त्यांच्याकडे एक वेगळी शैली होती. त्यांनी नमनात विनोदी भूमिका, गंभीर आणि भावनिक भूमिका सुद्धा उत्तम साकारल्या आहेत. त्यांनी लिहिलेले नमन कलेतील वगनाट्य दर्जेदार स्वरूपाची असतात. त्यांच्या लेखनाला एक वेगळी धार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT