कोकण

असनियेत मधुमक्षिका पालनाचे धडे

CD

09087

असनियेत मधुमक्षिका पालनाचे धडे

प्रशिक्षण वर्ग; योजना, अनुदानांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सिंधुदुर्ग, सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे तसेच कोकण श्री ग्राम सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी, तांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने असनिये (ता. सावंतवाडी) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित मधुमक्षिका पालन प्रशिक्षण वर्गाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकात्मिक फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत मधुमक्षिका पेटी व मध काढणी संयंत्र योजनेसाठी महाडीबीटीवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांच्या हस्ते झाले. उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी मधुमक्षिका पालनामुळे मिळणारे शेतीपूरक उत्पन्न, परागीभवनामुळे वाढणारी उत्पादन क्षमता आणि सेंद्रिय शेतीत या व्यवसायाचे वाढते महत्त्व, यावर प्रकाश टाकला.
सीबीआरटीआयचे तज्ज्ञ मार्गदर्शक हेमंतकुमार डुंबरे (पुणे) यांनी दिवसभर चाललेल्या या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. मधुमक्षिकांचे प्रकार, त्यांची कार्यपद्धती, पेट्यांचे विविध मॉडेल्स, रोगनियंत्रण, व्यवस्थापन तंत्र, फुलांच्या लागवडीमुळे वाढणारी मधउत्पादन क्षमता, मध गोळा करणे, प्रक्रिया करणे आणि पॅकिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह दाखवून दिली. मधुमक्षिका पालन हा कमी खर्चात लाभदायी ठरणारा पर्यायी व्यवसाय कसा होऊ शकतो, याचे सविस्तर मार्गदर्शन या सत्रात केले.
एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत उपलब्ध विविध लाभ, मधुमक्षिका पालनासाठी असलेल्या विविध योजना, अनुदाने आणि अर्ज प्रक्रिया याबाबत बांदा मंडल कृषी अधिकारी युवराज भुईम्बर यांनी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, उपकृषी अधिकारी मनाली परब, एस. ए. सरगुरू, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद निकम, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी तसेच सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सीबीआरटीआयकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT