कोकण

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे ‘एआय’चे धडे

CD

09114
मळेवाड ः उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षक बोळगावे.(छायाचित्र ः धनश्री मराठे)

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे ‘एआय’चे धडे
मळेवाड, ता. ७ ः प्रशिक्षित मार्गदर्शकाकडून मळेवाड गावातील कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस एआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच निमशासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनाही या प्रशिक्षणामुळे ते काम करत असलेल्या क्षेत्रांमध्ये आवश्यक असणाऱ्या माहितीकरिता ‘एआय’ मार्गदर्शक ठरणार आहे. मार्गदर्शक शिक्षक बोळगावे यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने कर्मचाऱ्यांना ‘एआय’बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये आरोग्य, शिक्षण विषयक व इतर आवश्यक माहिती एआयचा उपयोग करून कशी मिळवता येईल, याबाबत चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योती शिरसाट, सचिव पूर्वा नाईक उपस्थित होते.
---
09113
साळिस्ते ः रांबाडेवाडी महापुरुष मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

साळिस्ते महापुरुष मंदिराचे भूमिपूजन
तळेरे, ता. ७ : साळिस्ते रांबाडेवाडी येथील श्री महापुरुष देवस्थान मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम आज सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. यावेळी मुंबई स्थित ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. साळिस्ते रांबाडेवाडी येथील महापुरुष देवस्थान हे जागृत देवस्थान असून दरवर्षी मेमध्ये वार्षिक उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. सध्याचे मंदिर छोटे आणि खूप वर्षांपूर्वी बांधकाम केलेले असल्यामुळे सुसज्ज व प्रशस्त असे मंदिर बांधण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या कार्यात योगदान देण्याचे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT