कोकण

जिद्द, चिकाटी असेल तर वेळ बदलतेच

CD

-rat७p१९.jpg-
P२५O०९०६९
राजापूर ः मानसी हांदे हिचा सत्कार करताना पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक सक्रे आणि मान्यवर.
----
कष्टाची तयारी असेल तर यश मिळते
मानसी हांदे ः पॉवरलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक विजेती खेळाडू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः ध्येय ठरवून सातत्य, योग्य आहार व कष्टांची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते. अपयश व संघर्ष येतात, मात्र जिद्द आणि चिकाटी असेल तर वेळ नक्की बदलते, असा संदेश पॉवरलिफ्टिंग खेळात सुवर्णपदक विजेती मानसी हांदे हिने विद्यार्थ्यांना दिला. तसेच आईवडिलांचे मार्गदर्शन आणि शाळा-महाविद्यालयातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे क्रीडा क्षेत्रात वाटचाल शक्य झाल्याचे तिने सांगितले.
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, कोषाध्यक्ष राजू लब्दे, संचालक विकास कोलते, मुख्याध्यापक आशा गुरखे, पर्यवेक्षक प्रमिला गांधी आदी उपस्थित होते. याप्रसंगी ती म्हणाली, क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असून खेळात रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT