-rat७p१६.jpg-
२५O०९०६६
रत्नागिरी : जनता बॅंकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुंद भिडे यांचा सन्मान करताना बॅंकेचे अधिकारी श्री. पाटणकर, श्री. गानू आदी.
----
जनता बॅंकेतर्फे अॅड. भिडे यांचा सन्मान
रत्नागिरी, ता. ८ : मूल्याधिष्ठित वकिली व्यवसायाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील प्रथितयश विधिज्ञ मुकुंद भिडे यांना जनता सहकारी बँक (पुणे) परिवारातर्फे शाल, श्रीफळ, पुणेरी पगडीने सन्मानित करण्यात आले. राम आळी, रत्नागिरी शाखेत हा कार्यक्रम झाला.
भिडे हे बँकेशी २५ वर्ष विधान सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. भिडे यांच्या आठवणी बँकेचे श्री. पाटणकर आणि श्री. गानू यांनी सांगितल्या. काटेकोरपणा, शिस्त, कायद्यातील सजगता आणि भाषेतील स्पष्टता यामुळेच श्री. भिडे यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. वकिली व्यवसाय करीत असतानाच भिडे यांनी आपल्याकडे असलेल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करून, प्रेरणा देऊन प्रसंगी आर्थिक सहाय्य करून उच्चविद्याविभूषित केलं आहे. वृक्षसंवर्धन करताना रत्नागिरीच्या न्यायालयाच्या आवारात भिडे यांनी ४० वृक्षांची लागवड केली. त्याचे संगोपनही ते करीत आहेत.
कोकणातील जमिनीवर खैर वृक्ष लागवड करा आणि त्यापासून उत्पन्न मिळवा ही कल्पना श्री. भिडे यांनी २५ वर्षांपूर्वी मांडली होती. सरकारकडून त्या गोष्टीची आज दखल घेतली जात असल्याचे शिरीष दामले यांनी सांगितले. राजू जोशी यांनी वकेले. ओंकार केळकर यांनी आभार मानले.
---