राज्य नाट्य स्पर्धा - लोगो
rat7p18.jpg-
09068
रत्नागिरी- राज्य नाट्य स्पर्धेत स्टार थिएटर्स-रत्नागिरी या संस्थेने केलेल्या ''तू पालनहारी'' या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
---------------
भिक आणि भ्रष्टाचाराची कहाणी - ‘तू पालनहारी’
स्टार थिएटर चा यशस्वी प्रयत्न ; कलाकारांच्या अभिनयाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः मोठ-मोठ्या शहरात भिकारी आपला उदरनिर्वाह भिक मागून करत असतात. पण अलिकडे शैक्षणिक, समाजिक, राजकिय, विविध कंपन्या, नोकर चाकर, शासन कार्यालये, कामगार अशा सर्वच क्षेत्रात जीवन जगताना लाचारी पत्करुन जगावे लागते. एक प्रकारे भिक मागवी लागते. भिकारी हे जीवन नको म्हणून दोन भिकारी इतरांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. तेथेही भ्रष्टाचार, लाचारी, भिक मागणे त्यांच्या पदरी येते. समाजाच्या प्रत्येक घटकाचा मागोवा घेणारे नाटक तू पालनहारी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले. दिग्दर्शक अमर उर्फ अप्पा रणभिसे यांची संकल्पनेून ‘तू पालनहारी’ हे नाटक सादर झाले. दोन पत्रांच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेल्या या नाटकाला रसिकांनी दाद दिली.
----------
काय आहे नाटक ?
माणसाला जगण्यासाठी टिचभर पोटासाठी समाजातील सर्व क्षेत्रात लाचारी पत्करुन भिक मागावी लागते. भ्रष्टाचारी व्हावे लागते याचे उत्तम उदाहरण लेखक अमेय धोपटकर यांनी ‘तु पालनहारी’ या संहितेतून मांडले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील दोन भिकारी – पहिला आणि दुसरा – साधे जीवन जगण्याचा स्वप्न पाहतात. सुरुवातीला रेल्वे स्टेशनवर भिक मागण्याचा अनुभव घेताना ते समाजातील विविध क्षेत्रांचा मागोवा घेतात. दुसरा भिक मागत असतो तर पहिला त्याला समाजातील माणसांची जाण करून देतो. परदेशी पर्यटकांकडून मिळालेल्या वस्तू विकताना, पोलिस व इतर यंत्रणा लाचारी दाखवतात. मंदिर, सरकारी नोकरी, बांधकाम, बँक, ऑनलाईन व्यवसाय, निवडणूक, शिक्षण, अभिनय आणि पत्रकारिता अशा प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि लाचारी समोर येते. दोघेही भिकारी समाज बदलू शकत नाहीत हे जाणून घेतात, पण स्वतःच्या मुलांना शिक्षण व स्वावलंबन देण्याचा संकल्प करतात. मात्र एकाचा मुलगा भिकारी होतो, तर दुसरा मुलीला शिक्षण देवून मोठे करणार असतो. त्याचवेळी त्या मुलीचा अपघात होतो. तिच्या अत्यसंस्कारासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, मग तो पुन्हा भगवान के नाव पे दे रे बाबा, असे म्हणत दोघेही भिकारी आरडत असतात. अशी कथा तू पालनहारी या नाटकातून मांडण्यात आली. नाटकातून जीवनातील वास्तविकता, भ्रष्टाचार, लाचारी आणि स्वावलंबनाची शिकवण प्रभावी अभिनयाद्वारे साकारली जाते.
-------
सूत्रधार आणि साहाय
नेपथ्य ः विनायक आपकरे, आकाश रणभिसे. संगीत ः विशाल नाटकेर, संगीत नियोजन ः चंद्रकांत (बंड्या) आंबेरकर. प्रकाश योजना ः अनिकेत गानू, रंगभूषा ः निवराज मणचेकर, वेशभूषा ः विजय पोकळे, सूत्रधार ः संजय कांबळे.
------------
पात्र परिचय
पहिला ः विलास जाधव, दुसरा ः समीर इंदुलकर.
----------
आजचे नाटक
नाटक ः नमान, सादरकर्ते ः सुमती थिएटर, रत्नागिरी. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ५ वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.