कोकण

एआय- रोबो इनोव्हेशन्स फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

-rat७p१७.jpg-
२५O०९०६७
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित एआय रोबो इनोव्हेशन्स फेअरमध्ये प्रतिकृतीची माहिती विद्यार्थ्याकडून घेताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. अनुजा घारपुरे.
----
तरुणांची तांत्रिक कल्पकता झळकली
‘एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअरलार’ ; गोगटे महाविद्यालयात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : वर्ल्ड कॉम्प्युटर लिटरसी डेनिमित्त गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संगणकशास्त्र विभागाने एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअर प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनामध्ये द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि आयओटी ऑटोमेशनवर आधारित विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तरुणांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी प्रकल्पांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष कार्यान्वयन करण्याचे तसेच भविष्यात पेटंट घेण्याचे आवाहन केले.
बी.एम.एस, बॅफ, बी.कॉम, बी.एस्सी, गणित, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, बी.बी.ए, प्रथम वर्ष कला, ११ वी, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र. जैवतंत्रज्ञान, राष्ट्रीय छात्र सेना, पदव्युत्तर विभाग यांसारख्या विविध विभागांतील सुमारे ३०० विद्यार्थी तर शिर्के प्रशालेतील ६० विद्यार्थी आणि अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यातील, श्रीमान भागोजी विधी महाविद्यालयातील ८० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भेट देऊन प्रकल्पांविषयी जाणून घेतले.
---

Smriti Mandhana : स्मृती पुन्हा मैदानात परतण्यास सज्ज! लग्न मोडल्यानंतर सरावाला सुरुवात, Photo व्हायरल

वडील बेस्ट कामगार, पैशांसाठी पोहोचवले जेवणाचे डबे ; इंजिनिअर असलेल्या आरजे प्रणितची खरी स्टोरी घ्या जाणून

31 December Deadlines : ३१ डिसेंबर पर्यंतच करून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे; परतपरत नाही मिळणार संधी!

Viral: 50% दिव्यांग… पण हिम्मत 100%! 52 वर्षीय Zepto Delivery Partner महिला ठरतीय सर्वांसाठी प्रेरणा; व्हिडिओ एकदा पाहाच!

Latest Marathi News Update : इंडिगो एअरलाइन्समुळे बाधित झाल्याने प्रवाशांनी स्पेशल ट्रेन्सचा घेतला आधार!

SCROLL FOR NEXT