swt723.jpg
09215
कुणकेश्वर : येथील श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन एकनाथ तेली यांच्या हस्ते झाले.
विशेष श्रमसंस्कार शिबिराचे
कुणकेश्वर येथे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ : येथील न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायत सभागृहात झाला. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिक्षक मनोहर तेली यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश, ''स्वच्छ गाव-स्वच्छ भारत'' ही संकल्पना आणि सात दिवसांच्या उपक्रमांचे स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक मिलिंद भिडे, ग्रामसेवक गुणवंत पाटील, शुभांगी तेली तर वरिष्ठ महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी महेंद्र कामत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एन.एस.एस. सहकार्यक्रम अधिकारी स्नेहल जोईल यांनी आभार मानले.