swt83.jpg
09257
संजय गवस
केसरकर दोडामार्गचे प्रश्न मांडणार का ?
ठाकरे शिवसेनेची टिकाः हिवाळी अधिवेशनात वाचा फोडावी अशी अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ८: गेल्या तीन टर्मपासून आमदार दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या वाट्याला यापूर्वी मंत्रिपदही आले. ही संधी मिळूनही आपल्या मतदारसंघातील प्रमुख प्रश्नांवर कोणतीही ठोस कामगिरी त्यांनी केली नाही. आता अधिवेशनात तरी हत्ती-मानव संघर्ष, वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, आडळी एमआयडीसी, तिलारी पर्यटन, रोजगार व आरोग्य या प्रश्नांवर तोंड उघडणार का? अशी टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस यांनी पत्रकातून केली आहे.
गवस यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांचे हत्तींपासून प्रचंड नुकसान होत असून हत्ती पकड मोहीम थांबवण्यात आली आहे. परिस्थिती गंभीर असूनही वनखात्याचा प्रतिसाद मिळत नाही. साळिंदर, माकड, तांबड्या तोंडाची माकडे, शेकरू यांच्यामुळे नारळ, सुपारी व फळबागांचे प्रचंड नुकसान होत असताना शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नाही. नारळ फळाला किमान ४० रुपये, तर बांबू प्रती ५० रुपये किमान नुकसानभरपाई निश्चित करावी, अशी अपेक्षा गवस यांनी व्यक्त केली आहे.
आडाळी एमआयडीसीचा प्रश्न दशकानुदशके तसाच असून अद्यापपर्यंत कोणताही औद्योगिक विकास झालेला नाही. तिलारी धरण परिसरातील पर्यटनासाठी मोठी संधी असूनही सरकारने केलेल्या घोषणा फक्त कागदावरच आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. रुग्णांना उपचारासाठी बाहेर धाव घ्यावी लागत आहे. असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ग्रामपंचायतींमध्ये दहा वर्षांपासून वार्षिक आमसभा न घेणे ही लोकशाहीची पायमल्ली असल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चौकट
प्रश्न न मांडल्यास आंदोलनाचा मार्ग
मंत्रिपद भूषविलेले व सध्या विद्यमान आमदार म्हणून कार्यरत असलेले सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी तालुक्याच्या विकासा संबंधित प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने जनतेत रोष वाढत आहे. तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नावर आतातरी ते अधिवेशनात ठोस भूमिका घेतली का ? प्रखरतेने प्रश्न मांडतील का ? याबाबत साशंकता असल्याचे गवस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जर प्रश्न मांडले नाही तर, तालुक्यातील जनता आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.