-rat८p५.jpg-
२५O०९२४६
रत्नागिरी : कीर्तनसंध्या महोत्सवाची माहिती देताना डावीकडून महेंद्र दांडेकर, उमेश आंबर्डेकर, अवधूत जोशी, नितीन नाफड.
----
आफळेबुवा उलगडणार महाभारताचे पैलू
जानेवारीत कीर्तनसंध्या महोत्सव ; पाच दिवस पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारतावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारूदत्तबुवा आफळे उलगडणार आहेत. यंदाचे या कीर्तन महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. ६ ते ११ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलात होणार आहे.
२०१२ पासून गेली चौदा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. रामायणानंतर महाभारत या प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठ्या महाकाव्यातील काही भाग गेल्या वर्षीच्या महोत्सवात सादर करण्यात आला होता. महाभारत ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. महाभारताचा भारतीय संस्कृतीवर मोठा ठसा आहे. ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगीकारावीत, महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा, हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष, गुणविशेष दर्शवले आहेत. या साऱ्या इतिहासाचा सुरुवातीचा काही भाग आफळेबुवांनी गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात समजावून सांगितला होता. यावर्षी महोत्सवाच्या देणगी सन्मानिका कार्यक्रमाच्या ठिकाणीच म्हणजेच प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे उपलब्ध होणार आहेत.
-----------
चौकट
दोन दिवस व्याख्याने
कीर्तनसंध्या महोत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रवचनकार धनंजय चितळे यांची ‘विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत’ ही दोन दिवसीय व्याख्यानमाला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. व्याख्याने सर्वांसाठी खुली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.