09449
‘असरोंडी माध्यमिक’मध्ये
माजी विद्यार्थ्यांची बैठक
कणकवली, ता. ९ : माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत सावंत तर सचिवपदी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे माजी विद्यार्थ्यांची बैठक झाली. यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
यावेळी असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश सावंत, मुंबई मंडळाचे अध्यक्ष जयसिंग सावंत, प्रशालेच्या माजी शिक्षिका सुमन सावंत यांच्यासह ७० हून अधिक माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणी उपाध्यक्षपदी संतोष महाजन, कोषाध्यक्ष पदी संजय तिर्लोटकर , सदस्यपदी अजय सावंत, दिलीप तांबे, दत्ताराम सावंत, रुपाली घाडीगावकर, बाळकृष्ण सावंत, तमन्ना राणे, दुर्वा खांडेकर, कृष्णाजी बागवे, दीपिका यादव, मनीषा यादव, महेश गोवेकर, महेश शंकर सावंत, उमेश गावडे, मुख्याध्यापक सुशांत पाटील यांची तर सल्लागारपदी प्रकाश सावंत आणि जयसिंग सावंत यांची निवड करण्यात आली. भगीरथ चिंदरकर यांनी सूत्रसंचालन केले. रश्मी सावंत यांनी आभार मानले.