कोकण

साहित्य संमेलनानिमित्त २८ ला कृतज्ञता सन्मान

CD

साहित्य संमेलनानिमित्त
२८ ला कृतज्ञता सन्मान

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून येथील श्रीराम वाचन मंदिर या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व युवा मान्यवरांना त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत २८ डिसेंबरला होणाऱ्या उद्‍घाटन कार्यक्रमात मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुस्तक व रोख रक्कम एक हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल. यामध्ये विठ्ठल गावकर, ओटवणे (दशावतार लोककला), ना. शि. परब, वेंगुर्ले (साहित्य), आबा रणसिंग, कुडाळ (चित्रकथी), गणपत परब, सावंतवाडी (मौखिक गीते), डॉ. अशोक सुर्वे, सावंतवाडी (वैद्यक क्षेत्र), संजीवनी देसाई, कुडाळ (पत्रकारिता), प्रभाकर भागवत, सावंतवाडी (वाङमयीन कार्यकर्ता), विजयालक्ष्मी भोसले, बांदिवडे-मालवण (शिक्षण), बबन परब, अणाव (समाजसेवा), आनंद देवळी, मळगाव (ग्रंथपाल), अनिल हळदिवे, कणकवली (क्रीडा) यांचा समावेश आहे. युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या तरुणांमध्ये प्रसाद गावडे (पर्यावरण), रवी जाधव (सामाजिक कार्य), प्रमोद दळवी, विलवडे (शेती), मेगल डिसोजा, मालवण (पर्यावरण), पूजा गवस (हॉटेल व्यवसाय), अक्षय सावंत (चित्रकला) यांचा समावेश आहे. श्रीराम वाचन मंदिर येथे झालेल्या संमेलन संयोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रा. प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, रमेश बोंद्रे यांनी हे जाहीर केले. यावेळी राजेश मोंडकर, अभिमन्यू लोंढे, सुमेधा नाईक, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, विजय ठाकर, मंजिरी मुंडले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT