कोकण

गुहागर -किनाऱ्यावर वाळूत अडकली कार

CD

गुहागर किनाऱ्यावर
वाळूत अडकली कार
गुहागर, ता. ९ : समुद्रावरील वाळूमध्ये वाहने नेऊ नयेत, ही सक्त ताकीद असतानाही कोल्हापूर येथील एका पर्यटकाने रविवारी (ता. ७) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाळूमध्ये कार नेली; मात्र भरतीच्या पाण्यात कार अडकून पडली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कार पाण्याबाहेर काढण्यात आली. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गुहागर समुद्रकिनारा हा सहा किलोमीटर सलग लांबीचा आहे. गुहागरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील दोन युवकांनी गुहागर वरचापाट पिंपळादेवी या मार्गाने कार सुरूबनामध्ये नेत सिमेंटच्या रॅम्पवरून थेट वाळूमध्ये आणली. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झाली आणि स्कॉर्पिओ भरतीच्या पाण्याबरोबर समुद्रात फसली. नऊ वाजेपर्यंत या तरुणाने भरतीचे पाणी कमी झाल्यावर वाहन काढता येईल का, याची वाट पाहिली; मात्र भरतीचे पाणी वाढत असल्याने अखेर त्यांनी ११२ क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या व अनेक ग्रामस्थांच्या सहकार्याने कार पाण्याबाहेर काढून सुरूबनामध्ये लावण्यात आली आहे. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे. मनाई असताना समुद्राच्या पाण्यात वाहन नेणाऱ्या या युवकावर कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT