rat9p11.jpg
09512
साखरपा : पर्यावरणपूरक पत्रावळी.
पारंपरिक पत्रावळी,
द्रोण नामशेष होताहेत
साखरपा, ता. ९ : लग्नसमारंभात पंगतीत सर्रास दिसून येणाऱ्या पानांच्या पत्रावळी आणि द्रोण गेल्या काही वर्षानपासून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणपूरक पत्रावळींची जागा आता प्लास्टिकने घेतली आहे. हे प्लास्टिक निसर्गाला हानीकारक ठरत आहे.
कोकणात लग्न, मुंज, पूजा अन्य धार्मिक सणांना जेवण हे पत्रावळीवर वाढण्याची प्रथा आहे. वर्षानुवर्षे अशा पत्रावळी आमणी, मोहफूल, पळस अशा झाडाच्या पानांपासून तयार केल्या जात होत्या. या पत्रावळी नैसर्गिक असल्यामुळे पूर्णतः पर्यावरणपूरक होत्या. त्यांच्या विघटनामुळे निसर्गाला मदत होत होती; पण गेल्या काही वर्षांपासून बाजारात प्लास्टिकच्या पत्रावळी आणि द्रोण आले आहेत. त्यांचे विघटन होत नाही. अशा पत्रावळी नष्ट कशा करायचा, हा प्रश्न पर्यावरणप्रेमींपुढे आहे.