कोकण

गुगलसह ‘एआय’चा वापर वैज्ञानिक प्रयोगासाठी करा

CD

09552

गुगलसह ‘एआय’चा वापर
वैज्ञानिक प्रयोगासाठी करा

अरुण चव्हाण : विद्यामंदिरमध्ये विज्ञान प्रदर्शन

कणकवली, ता. ९ : वैज्ञानिक संकल्‍पना समजावून घेणे हे गुगल आणि एआयच्या माध्यमातून सहज सोपे झाले आहे. त्‍याचा फायदा घेऊन मानवतेच्या कल्याणार्थ नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांनी करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केले.
शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आज गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. माने, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्याक पी. जे. कांबळे, अच्युत वणवे, रामचंद्र नारकर, शरद चोडणकर, शिवाजी पवार, सूर्यकांत चव्हाण, चंद्रकांत पोकळे, सुशात मर्गज, निलेश ठाकूर, हनुमंत वाळके, एस. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, संजय पवार, विजय भोगटे, संदीप कदम, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी किशोर गवस म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी दरवर्षी तालुका आणि जिल्‍हापातळीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करीत आहेत. या प्रदर्शनांमधून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, हा उद्देश आहे. अशा प्रदर्शनांमधून पुढील काळात निश्‍चितपणे वैज्ञानिक निर्माण होतील. दरम्‍यान शेतीक्षेत्रातही वैज्ञानिक प्रयोग होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे. सेंद्रीय शेतीमधील उत्‍पादकता वाढावी यासाठीही मुलांमध्ये जागरूता केली जात आहे.’ मुख्याध्यापक पिराजी कांबळे आणि अच्युतराव वणवे यांनी स्वागत केले. शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या शिरसाट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT