-rat९p१७.jpg-
P२५O०९५४४
रत्नागिरी : (कै.) दिलीप टिकेकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त खेळाडू.
---
बुद्धिबळमध्ये सौरिश कशेळकर विजयी
टिकेकर स्मृती स्पर्धा ; वरद पेठे उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित (कै.) दिलीप टिकेकर स्मृती जिल्हास्तरीय जलद व अतिजलद या दोनही स्पर्धांचे विजेतेपद रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याने पटकावले.
जलद स्पर्धेतील अतिशय अटीतटीच्या अंतिम फेरीत सोहम रूमडे विरूद्ध खेळताना मोक्याच्या क्षणी सोहमने केलेल्या चुकीचा फायदा उठवत सौरिशने डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या एका अंतिम फेरीतील रंगलेल्या डावात वरद पेठे याने प्रवीण सावर्डेकर विरूद्ध विजय प्राप्त केला. सौरिश व वरद दोघांचेही ७ फेऱ्यांअखेर ६ गुण झाले; पण सरस टाय ब्रेक गुणांवर सौरिश विजेता ठरला तर वरदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तेजस्वर कांबळे, श्रीहास नारकर व सोहम रूमडे यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. चिपळूणच्या साहस नारकर व प्रवीण सावर्डेकर यांनी प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक प्राप्त केला. आयुष रायकर, आर्या करकरे, सुहास कामतेकर, लवेश पावसकर, आर्या पळसुलेदेसाई, अलिक गांगुली, अथर्व साठे, विहंग सावंत व शर्विल शहाणे यांनी जलद स्पर्धेतील विविध गटांची उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शरयू दिलीप टिकेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी निखिल टिकेकर, प्रा. मंगेश मोडक, चैतन्य भिडे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रांत फडके यांचे सहकार्य लाभले.
चौकट १
अतिजलद स्पर्धा रोमहर्षक
अतिजलद स्पर्धा आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. अंतिम फेरीतील सामन्यात यश गोगटेने साहस नारकर विरूद्धचा डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या पटावरील अतिशय उत्कंठावर्धक डावात साईप्रसाद साळवी याने सौरिश विरूद्धचा जिंकत आलेला डाव घड्याळातील वेळेच्या दबावाखाली गमावला. याचा फायदा उठवत सौरिशने गुणांमध्ये यशला गाठले व सरस टायब्रेकच्या आधारावर अतिजलद स्पर्धेचेही विजेतेपद प्राप्त केले तर यश उपविजेता ठरला. वरद पेठे, श्रीहास नारकर, सोहम रूमडे यांनी प्रत्येक ६ गुणांसह तिसरा ते पाचवा क्रमांक पटकावला. आर्यन धुळप १५ वर्षे, आयुष रायकर १२ वर्षे तर शर्विल शहाणे ९ वर्षे वयोगटात प्रथम आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.