कोकण

संगमेश्वर-देवरुख संगमेश्वर मार्गावरील खड्डे भरण्याचे काम थांबले

CD

rat१०p५.jpgः
P25O09706
संगमेश्वर -देवरूख मार्गावरील मयूरबाग येथे याच ठिकाणी मंगलकार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेले खड्डे.

देवरूख-संगमेश्वर रस्त्याचे काम थंडावले
वाहनचालकांमध्ये नाराजी ; जागोजागी खड्डे, दुचाकी घसरून अपघातात वाढ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः पावसाने विश्रांती घेतल्यानंतर एक महिना उलटून गेला तरीही संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील भयावह खड्डे भरण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबद्दल वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत असून, बुधवारी (ता. १०) सकाळी मयूरबाग येथील शुभगंधा मंगल कार्यालयासमोर खड्ड्यात आपटून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर अनेक वाहनचालक अपघातस्थळी जमा झाले होते. या मार्गावरील खड्डे भरा अन्यथा रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा या वेळी वाहनचालकांनी दिला आहे.
संगमेश्वर ते बुरंबीदरम्यान रस्त्याचा भाग शिल्लकच राहिलेला नाही. वाहने गेल्यानंतर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरते. या मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांच्या घरात दररोज धुळीचे लोट येऊन वृद्ध माणसांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. एवढं घडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग हे सारे निष्क्रियपणे पाहत आहेत. संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील जीवघेणे खड्डे आठ दिवसात भरले जातील, असे आश्वासनही उपअभियंता वैभव जाधव यांनी दिले होते; मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. संगमेश्वर-बुरंबी या मार्गावरील खड्डे भरले गेले असते तर आज सकाळी मयूरबाग येथे दुचाकीचा अपघात घडून तरुणी गंभीर जखमी झाली नसती, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत. या अपघातानंतर माणुसकी म्हणून एका मोटार चालकाने गंभीर जखमी तरुणीला तातडीने दवाखान्यात दाखल केले. या अपघातामधील जखमीचे नाव समजू शकलेले नाही.
-----
चौकट
त्या मागणीकडे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरूख कार्यालयाने संगमेश्वर ते लोवलेदरम्यान महावितरणच्या ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूपट्टीवर बेजबाबदारपणे सिमेंटचे खांब पोल उतरवून ठेवले आहेत. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही अद्याप केली गेलेली नाही. त्यामुळे तिथे गंभीर अपघात घडण्याची भीती वाहनचालकांसह पादचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Chairman Apology Video : आता ‘इंडिगो’च्या अध्यक्षांचाही माफीनामा ; ‘CEO’नी आधीच सरकारसमोर जोडले होते हात!

Eknath Khadse : भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना मोठा धक्का; दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने नाकारला!

Pune IT Company employee News : ‘कॅन्सर’ झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुनच काढलं? ; पुण्यातील प्रसिद्ध 'IT' कंपनीतील प्रकार

Akola News : अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावर विधानसभेत तीव्र संताप; सेंट अ‍ॅन्स शाळेची मान्यता रद्द करण्याची आ. रणधीर सावरकर यांची मागणी!

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर...

SCROLL FOR NEXT