कोकण

हायटेक बसस्थानकाचा पत्रा प्लॅन म्हणजे निर्लज्जपणाचा बाजार

CD

चिपळूण हायटेक बसस्थानक रखडलेच
शौकतभाई मुकादम ः जुना आराखडा लागू करा, अन्यथा आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. गेली आठ वर्षे चिपळूण येथे हायटेक बसस्थानक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. आता त्यावर पत्रा टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे केले तर तो निर्लज्जपणाचा बाजार आहे. पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे चिपळूण बसस्थानक हायटेक झाले पाहिजे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
माजी सभापती मुकादम म्हणाले, चिपळूण आगाराचे पूर्वीचे बसस्थानक हे अतिशय चांगले होते. नवीन बसस्थानक होणार म्हणून जुने तोडले गेले. आता नवीन सुरू असलेल्या कामावर पत्रा प्लॅन करणार म्हणजेच चिपळूणची जनता व प्रवाशी यांच्या नजरेत धूळफेकीचा प्रकार आहे. जिल्ह्यातील इतर भागात कोट्यवधीचा निधी खर्च करून विविध प्रकल्प उभे केले जात आहेत; मात्र कोकणातील चिपळूणसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नवे बसस्थानक होऊ शकत नाही का? राज्यशासनाने अनेक रेल्वेस्थानकामध्ये करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरण केले; मात्र चिपळूण येथील हायटेक बसस्थानकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याला निधीची तरतूद झालीच पाहिजे. पूर्वीच्या प्लॅनप्रमाणे चिपळूणमध्ये हायटेक बसस्थानक झाले पाहिजे अन्यथा आंदोलन करावे लागेल, असे मुकादम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT