शिष्यवृत्ती सराव
परीक्षा जानेवारीत
कुडाळ ः शिक्षक भारती सिंधुदुर्ग आणि नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वप्राथमिक (पाचवी) व उच्च प्राथमिक (आठवी) शिष्यवृत्तीची सराव परीक्षा २५ जानेवारीला आयोजित केली आहे. ही परीक्षा सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक - सकाळी ८.३० ते १० : पेपर क्रमांक १, १० ते १०.३० सुटी, १०.३० ते १२ पेपर क्रमांक २ असे राहील. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, तसेच किमान ३० परीक्षार्थी असलेल्या शाळांमध्ये स्वतंत्र परीक्षा केंद्राची व्यवस्था केल्याची माहिती आयोजकांनी दिली. फेब्रुवारी-२०२६ मधील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब आणि दीपक भोगटे (नाथ पै सेवांगण कट्टा) यांनी केले आहे.
......................
पोलिसपाटलांचा १७ ला
अणसूर येथे स्नेहमेळा
वेंगुर्ले ः गाव कामगार पोलिसपाटील संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा वेंगुर्लेतर्फे सावंतवाडी उपविभाग (प्रांत) पोलिसपाटील संघटनेच्या संकल्पनेतून बुधवारी (ता. १७) श्री देवी सातेरी मंगल कार्यालय रामघाट अणसूर येथे पोलिसपाटील दिन जरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील पोलिसपाटलांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. गाव कामगार पोलिसपाटील संघटनेचे सावंतवाडी प्रांत विभाग व तालुका विभाग पदाधिकारी, सदस्य, उत्सव समिती अध्यक्ष व समिती सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मधुसूदन मेस्त्री-सुतार यांनी केले आहे.
..................
‘वारकरी संप्रदाय’च्या
पुरस्कारांसाठी आवाहन
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गतर्फे दरवर्षी दोन वारकऱ्यांना दिला जाणारा संतसेवा पुरस्कार व ज्येष्ठ कीर्तनकारासाठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावयाचे आहेत. वय वर्षे ६५ पूर्ण असलेल्या ज्येष्ठांनाच हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ मृदंगमणी दोन पुरस्कार, तसेच एक ज्येष्ठ वारकरी पुरस्कार (वय ८०) याप्रमाणे आणखी दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. अर्जदार हा मंडळाचा सभासद असावा. यावर्षीच्या पुरस्कारांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी विश्वनाथ गवंडळकर, गणपत घाडीगावकर, तसेच मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली या पत्त्यावर १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
.....................
शिक्षणाधिकारी
कमळकर यांची
कोल्हापुरात बदली
ओरोस ः महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अमधील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या असून या संबंधीच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची बदली केली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथील सहाय्यक शिक्षण संचालक या समकक्ष पदावर त्यांची बदली झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.