09766
आंबोली : येथील मंदिर परिसरात स्वच्छता करताना ग्रामस्थ.
09767
कुणकवण : येथील बुद्ध विहार परिसरात स्वच्छता करताना ग्रामस्थ.
जिल्ह्यात स्वच्छतेसाठी एकजूट; ४४३ मंदिरांसह परिसर चकाचक
मोहिमेस प्रतिसाद; २११२ किलो कचरा संकलित, ८९७० जणांचे श्रमदान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून आयोजित मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ४४३ मंदिरांमध्ये ८९७० ग्रामस्थांनी श्रमदान केले. या कार्यक्रमांतर्गत ६२५ किलो प्लास्टिक कचरा तर १४८७ अन्य असा २११२ किलो कचरा गोळा झाला. जमा कचऱ्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य विल्हेवाट लागण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ९) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी ८ ते ११ या कालावधीत मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान करून जिल्ह्यातील ४४३ मंदिराची स्वच्छता केली. यात देवगड तालुक्यात १०२ मंदिराची स्वच्छता करण्यासाठी २०८२ ग्रामस्थांनी श्रमदान करून २७० किलो प्लास्टिक व ६६२ किलो अन्य कचरा असे ९३२ किलो कचरा गोळा केला.
वैभववाडी तालुक्यात ३९ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी १०६५ ग्रामस्थांनी श्रमदान करून ५८ किलो प्लास्टिक व ५४ किलो अन्य कचरा असा ११२ किलो कचरा गोळा केला. कणकवली तालुक्यात ६३ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी ७०० ग्रामस्थांनी श्रमदान करून १० किलो प्लास्टिक व १३२ किलो अन्य कचरा असे १४२ किलो कचरा गोळा केला. मालवण तालुक्यात ६५ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी १७३९ ग्रामस्थांनी श्रमदान करून ९८ किलो प्लास्टिक व १२२ किलो अन्य कचरा असा १२० किलो कचरा संकलित केला. कुडाळ तालुक्यात ५४ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी ८६२ ग्रामस्थांनी श्रमदान करून ५६ किलो प्लास्टिक व ७१ किलो अन्य कचरा असे १२७ किलो कचरा गोळा केला. वेंगुर्लेत ५९ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी १०१८ ग्रामस्थांनी श्रमदान करून ४६ किलो प्लास्टिक व २७० किलो अन्य कचरा असे ३१६ किलो कचरा गोळा केला. सावंतवाडी तालुक्यात २७ मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी ६८० ग्रामस्थांनी श्रमदान करून ८.५ किलो प्लास्टिक व ३७ किलो अन्य कचरा असे ६४ किलो कचरा गोळा केला आहे. दोडामार्ग तालुक्यात ३४ मंदिराची स्वच्छता करण्यासाठी ८२४ ग्रामस्थांनी श्रमदान करून ७७.५ किलो प्लास्टिक व १३९ किलो अन्य कचरा असा २१६.५ किलो कचरा गोळा केला.
---
09781 (ग्राफ)
तालुकानिहाय मंदिरांमधील स्वच्छता
*तालुका*मंदिरे*संकलित कचरा (किलोमध्ये)
*वैभववाडी*३९*११२
*कणकवली*६३*१४२
*मालवण*६५*१२०
*कुडाळ*५४*१२७
*वेंगुर्ले*५९*३१६
*सावंतवाडी*२७*६४
*दोडामार्ग*३४*२१६.५
---
चौकट
४६०८ पुरुष, ४३६२ महिलांचे श्रमदान
जिल्ह्यातील ४४३ मंदिरांत मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करताना ४६०८ पुरुष तर ४३६२ महिलांनी श्रमदान केले. जमा कचऱ्याचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याबाबत सूचना दिल्या, अशी माहिती सीईओ खेबुडकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.