कोकण

आयएसओ शेनाळे शाळा केंद्रात चॅम्पियन

CD

- Rat११p११.jpg
२५O०९९३७
शेनाळे: चॅम्पियनशिप स्वीकारताना आयएसओ शेनाळे शाळेचे विद्यार्थी.
----
हिवाळी स्पर्धेत शेनाळे शाळेची झळाळी
विद्यार्थ्यांच्या कामागिरीला दाद ; ९३ स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ ः रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत शेनाळे केंद्रातील हिवाळी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शेनाळे यांच्यावतीने घेण्यात आल्या होत्या. यामध्ये लहान आणि मोठ्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद शाळा शेनाळेने पटकावले.
शेनाळे शाळेचे केंद्रप्रमुख सुनील आईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. केंद्रातील एकूण ९३ स्पर्धक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभाग घेऊन आपले क्रीडा नैपुण्य सादर केले. या स्पर्धांचे उद्‍घाटन ग्रामपंचायत शिरगावचे सरपंच गणेश पेंढारे, माजी सरपंच विश्वनाथ सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित सालेकर, उपाध्यक्ष पूजा कुटेकर, पोलिस पाटील अमित बैकर, डॉ. उमाकांत सालेकर, भगवान सावंत, हरीश सालेकर, दिनेश शिंदे, प्राप्ती दळवी, सुप्रिया धोंडगे, सुश्मिता मनवे, नंदिनी साळवी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी परिसरातील ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. प्रभागस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून केंद्राचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा सरपंच पेंढारे यांनी व्यक्त केली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीगुरूदेव दत्त फाउंडेशन यांच्या संस्थापिका नीलम बेंगडे पाटील यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमातील मान्यवरांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT