कोकण

गोंधळेकर परिवाराकडून देगावमधील अतिवृष्टीग्रस्तांना मदत

CD

गोंधळेकर परिवाराकडून
अतिवृष्टीग्रस्तांना मदत
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ११ ः अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील देगाव गावात भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गोंधळेकर परिवाराकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या गावातील २६ अतिवृष्टीग्रस्तांना जवळपास ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच देगाव येथील अंगणवाडीला संगणक संच भेट देऊन शैक्षणिक सुविधेत भर घातली.
इंदिराबाई गोंधळेकर यांच्या स्मृतिदिनी मदतीचे वितरण करण्यात आले. या वेळी सरपंच अनुराधा भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शिंदे, अंगणवाडी सेविका ज्योती म्हाप्रळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाराम बाईत, रामचंद्र गोलांबडे आणि सुरेश करंजकर आदी उपस्थित होते. आर्थिक मदत देण्यासाठी मीना सहस्रबुद्धे यांचे विशेष योगदान आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा निधी सुपूर्द करून लोकसेवेची प्रेरणादायी परंपरा जपली. या कार्यक्रमाला अशोक गोंधळेकर, मीनल आपटे, शिल्पा घैसास, वृषाली कान्हेरे आदी उपस्थित होते. या वेळी रमाकांत शिंदे यांनी वेळोवेळी मदतीसाठी पुढे येणाऱ्या गोंधळेकर परिवाराचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT