कोकण

आर्यन सुर्वेचा झेंडा

CD

-rat११p५.jpg-
P२५O०९९१७
आर्यन सुर्वे
----
रत्नागिरीचा आर्यन देशात चमकला
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ; ७२ हजार स्पर्धकांवर मात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः भारत सरकारच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ या प्रतिष्ठित स्पर्धेच्या ग्रॅंड फायनलमध्ये रत्नागिरीतील आर्यन सुर्वे याच्या नेतृत्वाखालील महा वायू इनोव्हेशन्स संघाने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातून ७२ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झालेल्या स्पर्धेची अंतिम फेरी ८ व ९ डिसेंबरला कर्नाटकातील धारवाड येथे झाली. पुण्याच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आर्यनने आपल्या संघासह ३६ तास सतत कोडिंग करून नावीन्यपूर्ण सोल्यूशन सादर केले व सर्वांना मागे टाकत अव्वल ठरला. विजेत्या संघाला ७५ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. आर्यनचे आजोबा विकास मलुष्टे हे रत्नागिरीत वास्तव्याला आहेत. त्यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ७२ हजार स्पर्धकांमध्ये टिकून राहून प्रथम येणे, हे आर्यनच्या चिकाटी व बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा, चिपळूण व कोकणवासियांना त्याचा अभिमान आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही नवसंशोधन व कोडिंग क्षेत्रातील अग्रगण्य स्पर्धा असून यात यश मिळवणे हे अत्यंत कठीण मानले जाते. रत्नागिरीच्या या होतकरू तरुणाने देशाला दिलेल्या या भेटीमुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT