कोकण

पोलिसपाटलांचे वेळेत मानधन जमा होणार

CD

पोलीसपाटिलांचे मानधन
वेळेत जमा होणार
मंडणगड ः पोलिसपाटील संघटनेच्या प्रलंबित मागण्यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर विधानभवनात मंत्री कदम यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन दिले. बैठकीत पोलिस पाटलांचे मानधन वेळेवर मिळावे, वाळू ड्यूटी रद्द करण्यात यावी, प्रवासभत्ता दुप्पट करावा, अनुकंपा कायदा लागू करावा तसेच सेवानिवृत्तीनंतर एकरकमी २० लाख रुपयांचा लाभ मिळावा, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यावर प्रतिसाद देताना मंत्री कदम यांनी अधिवेशन संपल्यानंतर पुढील दहा दिवसांत पोलिस पाटील प्रतिनिधींशी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले तसेच संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षकांना मानधन वेळेवर देण्याबाबत पत्र जारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाळू ड्युटीबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना सूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशदेखील त्यांच्या वतीने देण्यात आले.

- rat११p२०.jpg-
२५O०९९७०
सचिन टोकले

बुद्धिबळ,सूर्यनमस्कारात
सचिन टोकलेंचे यश
गावतळे ः माध्यमिक शिक्षण विभाग व शासकीय अध्यापक विद्यालय माजी विद्यार्थी मंडळ यांच्यातर्फे जिल्हास्तरीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेत सचिन टोकले यांनी बुद्धिबळ आणि सूर्यनमस्कार स्पर्धेत मोठे यश मिळवले. ही स्पर्धा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाली. स्पर्धांचे उद्‍घाटन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते झाले. यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, सूर्यनमस्कार, टेबल टेनिस, धावणे यासारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला. करंजाळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक सचिन टोकले यांनी सहभाग घेऊन बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम, तर सूर्यनमस्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.


स्वयंसेवकांनी बांधला
बोरघरमध्ये बंधारा
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे, मंडणगड तालुका कृषी कार्यालय आणि माहू बोरघर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने माहू बोरघर परिसरात बंधारा बांधण्यात आला. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी पाणी अडवल्याचे फायदे, कोकणातील मुबलक पावसाचा योग्य उपयोग तसेच डोंगरउताराच्या भूभागामुळे पाणी साठवणुकीचे महत्त्व सांगितले. बंधारा बांधण्यासाठी मंडणगड तालुका कृषी कर्मचारी जे. एम. पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया चांदीवडे, महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. मुकेश कदम, डॉ. संगीता घाडगे, स्वयंसेवक-स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

Gold Rate Today : तीन दिवसांत सोनं ₹6,500 तर चांदी ₹20,000 ने स्वस्त! भाव घसरले तरीही दागिने खरेदीत मंदी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT