कोकण

सोनवी पूल परिसरात वाहतूक कोंडी

CD

- rat११p३.jpg-
२५O०९९१५
संगमेश्वर ः सोनवी पूल परिसरात झालेली वाहतूक कोंडी.
-------
सोनवी पूल परिसरात वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरच वेगवान होईल, असा दावा केला जात आहे; पण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात महामार्गावरील अनेक पूल आणि चौपदरीकरणाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. संगमेश्वर येथील सोनवी पूल आणि आजूबाजूच्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे; परंतु वाहतूक कोंडीने येथे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दररोज येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होते
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाहतूककोंडीचे प्रमाण वाढतच चालले आहे. रुग्णवाहिकासुद्धा बराचवेळ अडकून पडत आहेत. काही ठिकाणी पोलिस आणि ठेकेदार कंपनीचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी परिस्थिती नियंत्रणात येण्यास वेळ लागत आहे.
प्रशासनाने येथील वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतुकीचा खोळंबा दूर करावा, अशी मागणी लोकांमधून होत आहे. संगमेश्वर सोनवीपूल ते पैसाफंड इंग्लिश स्कूलदरम्यान रस्त्याला पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी केली आहे. पैसाफंड इंग्लिश स्कूलजवळ सर्व्हिस रोड न काढता काम सुरू केल्याने येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT