-rat११p४३.jpg-
२५O१००४८
चिपळूण : शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे रखडलेले काम सध्या वेगाने सुरू आहे.
-----
मुंबई–गोवा महामार्गावर अर्धवट कामांचा डोंगर
प्रवासात अडचणी ; ११ ठिकाणी अपूर्ण काम, पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : मागील १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा दावा पोकळ ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण, या महामार्गावरील तब्बल ११ मोठमोठी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी एका पत्राद्वारे महामार्गावरील प्रलंबित कामे व त्यातील त्रुटींकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. ही कामे दिलेल्या वेळेत व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पळस्पे ते कासूदरम्यानचा खारपाडा व दूरशेत पूल खड्डेमुक्त करणे, पेण-रामवाडी पुलावरील पाण्याचा निचरा, पाणी तुंबण्याच्या समस्या, कासू ते इंदापूरमधील आमटेम, कोलेटी, नागोठणे, खांब, पुईगाव, कोलाड, तळवली पूल व बाह्यरस्ता अपूर्ण, वाकण नदीपूल खड्डेमुक्त करणे, इंदापूर ते वडपालेदरम्यान इंदापूर व माणगाव पुलाचे काम, मुगवली बाह्यरस्ता तळेगाव वाडी पॅचवर्क, लोणेरे पूल व बाह्यरस्ता, पोलादपूर घाटउतारावर अर्धवट स्पीडब्रेकर, वडपाले ते भोगावमधील सावित्री नदी पूल व जवळच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, पोलादपूरमध्ये पादचारी पूल, कशेडी पूल खड्डेमुक्त करणे, कशेडी बोगद्यात पाणीगळती ही कामे अर्धवट आहेत. तसेच भरणेनाका बाह्यरस्ता वळण, खेड रेल्वेस्थानक येथील पुलाचे काम व बाह्यरस्ता, भोस्ते घाटातील गतिरोधक, आवशी पूल व बाह्यरस्ता, लोटे आणि धामणदेवी येथील खड्डेमय बाह्यरस्ता, आरवली येथील दुसरी मार्गिका, संगमेश्वर रेल्वेस्टेशन अलीकडील रस्ता, कसबा पूल, संगमेश्वर उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे, तिथे अरुंद रस्ता आहे, बावनदी ते सोनगिरी संगमेश्वर टप्प्यात अनेक ठिकाणचे काम अर्धवट आहे.
---------
कोट
बावनदी ते निवळी रस्ताकाम सुरू आहे; परंतु पर्यायी रस्ता खराब आहे, रिफ्लेक्टरचा अभाव, टोलगेट ते कोकजे पठारमधील घाट भागही खराब आहे, निवळी-डांगरवाडी येथील उड्डाणपूल, हातखंबा येथील नवीन रस्त्याचे काम बाकी आहे. पाली उड्डाणपूल अपूर्ण असून बाह्यरस्ता खराब आहे. आंजणारी ते मठमधील काही काम अपूर्ण आहे. लांजा येथील उड्डाणपूल व रस्त्याचे बरेच काम बाकी आहे.
-नीलेश मोरे, संगमेश्वर
-----
कोट
राष्ट्रीय महामार्ग विभाग वरिष्ठ कार्यालय जे आदेश देईल त्याप्रमाणे ठेकेदार एजन्सीकडून चौपदरीकरणाच्या दुरुस्तीची कामे करून घेतली जातील. कामात विलंब झाला आहे हे खरे आहे; परंतु सध्या कामाचा वेग पाहता पुढील सहा महिन्यात चौपदरीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.