- rat१२p३.jpg-
२५O१०१७६
पावस ः केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केल्यानंतर बक्षीस स्वीकारताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाखरे क्र. एकच्या विद्यार्थिनी.
----
केंद्रस्तरावर नाखरे शाळेचा दबदबा
मुलींचा खो-खो संघ अव्वल; रनपार येथे स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ ः पावस-गोळप उर्दू शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ ने चमकदार कामगिरी केली. मोठ्या गटात मुलींचा खो-खो संघ विजयी तर कबड्डी संघ उपविजयी ठरला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. शिक्षण विभागाकडून आयोजित स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात पावस-गोळप उर्दूच्या केंद्रस्तरीय स्पर्धा रनपार येथे झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ ने चमकदार कामगिरी केली. यामध्ये मोठ्या गटात मुली खो-खो संघ विजयी तर कबड्डी संघ उपविजयी ठरला. यशस्वी खेळाडूंना शिक्षक सुहास वाडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी विशेष मार्गदर्शन केले. वैयक्तिक स्पर्धेतील नाखरे शाळेचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी : भावेश हरमले (धावणे), सार्थक गुरव (बॅडमिंटन), स्वरूप मेस्त्री (बुद्धिबळ). रौप्यपदक प्राप्त ः क्षितिजा सोमेस्कर (धावणे), अस्मी धुळप (उंचउडी), संस्कार कुळ्ये (लहान गट धावणे).