कोकण

चिपळूण-परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे कामाला वेग

CD

rat12p22.jpg
10219
चिपळूणः येथील परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
-rat12p16.jpg-
10206
चिपळूण ः शहरात महामार्गालगत सुरू असलेल्या मोऱ्यांचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी हरकत घेतली होती.
----------

परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या कामाला वेग
पावसाळ्यात ढासळली होती ; डोंगरांना जाळ्याही बसवणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात बांधण्यात येत असलेल्या आणि पावसाळ्यात ढासळलेल्या गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दरडीचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीएचडीसीएल) यांची विशेष नेमणूक करून घाटाचे सखोल सर्वेक्षण करवून घेतले. त्यांच्या सूचनेनुसार कोट्यवधींच्या निविदेद्वारे डोंगरांना जाळ्या बसवणे व गॅबियन वॉल उभारणीचे काम सुरू केले गेले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे ५.४० किमीचा परशुराम घाट हा कोकण प्रदेशातील महत्त्वाचा घाटमार्ग मानला जातो. चौपदरीकरणासाठी हा घाट चिपळूण व खेड अशा दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला; मात्र, घाट तोडफोडीपासूनच या कामांना वारंवार विघ्नांचा सामना करावा लागला. कामादरम्यान अपघाती मृत्यू, सतत दरडी कोसळणे, संरक्षण भिंतींना तडे जाणे अशा घटनांमुळे चौपदरीकरणाचा वेग लक्षणीयरित्या कमी झाला होता.
मात्र, मागील मे महिन्यात यात पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच अनपेक्षितरित्या मुसळधार पाऊस कोसळल्याने कामावर पाणी. फिरले. अनेक ठिकाणी गॅबियन वॉल कोसळल्याने महामार्ग विभागाने सर्व कामे तात्पुरती स्थगित करत घाटात केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाच्या पाण्यामुळे उर्वरित बांधकामाचे नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादनही तात्पुरते टाकण्यात आले होते.
पावसाळा संपताच आता घाटातील अपूर्ण कामांना वेग देण्यात आला आहे. सुधारित रचनेनुसार गॅबियन वॉल उभारणी पुन्हा सुरू झाली असून, ती जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या स्लॅबचे ८०० मीटरहून अधिक काम पूर्ण झाले असून, जोडरस्त्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांमुळे परशुराम घाटातील वाहतूक पूर्ववत आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न महामार्ग व संबंधित कंत्राटदार कंपनीकडून केला जात आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कोकणवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
प्रांत कार्यालयाच्या मागील भागातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मोऱ्यांचे काम सुरू आहे; मात्र हे काम समपातळीचा विचार न करता होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकते नित्यानंद भागवत यांनी संबंधित विभागांकडे केली. त्यानंतर हे काम तात्पुरते थांबवण्यात आले. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना नियोजित आराखड्यानुसारच काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीशी चर्चा केली असून, हे काम प्राथमिक टप्प्यात असून नियमानुसारच पूर्ण केले जाईल, असे कंपनीने सांगितले.

कोट
परशुराम घाटात पावसाळ्यात ढासळलेल्या गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू केले आहे. या वेळी आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. संरक्षण भिंत ढासळणार नाही, याची काळजी घेतली जाईल. येथील मातीचे परीक्षण केले आहे. त्यानंतरच नव्या आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.
- अमोल माडकर, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT