कोकण

विधी सेवासदनाचे रविवारी उद्घाटन

CD

विधी सेवासदनाचे
रविवारी उद्घाटन
रत्नागिरीः जिल्हा व सत्र न्यायालय येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवासदन’ इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालय परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव हे आहेत. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केले आहे.
-------
शिष्यवृत्ती परीक्षा
अर्जास १५ पर्यंत मुदत
रत्नागिरी ः परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा २२ फेब्रुवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता २७ ऑक्टोबर ते ८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता शाळांना १५ डिसेंबरपर्यंत द्वितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवले आहे. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी १५ डिसेंबर अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर करण्याची मुदत २३ डिसेंबर असून, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबर तर अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबर आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही.

-------

‘एमईएस नर्सिंग’तर्फे
चिपळूणमध्ये शिबिर
चिपळूण ः इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग आणि एच. डी. एफ. सी. बँक चिपळूण यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर उद्या (ता. १३) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग येथे होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये रक्तदानाविषयी जागरूकता वाढवणे तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. स्थानिक नागरिकांनी या शिबिरात उत्साहाने सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे. आयोजकांकडून सुरक्षित व सुव्यवस्थित रक्तदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आली असून, पात्र दात्यांना वैद्यकीय तपासणीनंतरच रक्तदान करता येणार आहे. मानवतेच्या सेवेसाठी केलेले हे योगदान अनमोल असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT