swt125.jpg
10224
सावंतवाडी ः येथील इनरव्हिल क्लबतर्फे जेष्ठ नागरिक संघास जेष्ठ रुग्णांसाठी उपयुक्त रुग्ण साहित्य सुपूर्त करण्यात आले.
सावंतवाडी इनरव्हिलतर्फे
जेष्ठ रुग्णांसाठी साहित्य
सावंतवाडी, ता. १२ः इनरव्हिल क्लब, सावंतवाडी यांनी जेष्ठ रुग्णांसाठी उपयुक्त असे रुग्ण साहित्य, जेष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. तालुक्यातील ज्येष्ठ रुग्णांसाठी, हे रुग्ण साहित्य सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये व्हील चेअर, वॉकर, वॉकिंग स्टिक, फोल्डिंग कमोड चेअर, कुबड्या इत्यादी रुग्ण साहित्य ज्येष्ठांच्या सेवेसाठी उपलब्ध असून, त्यासाठी गरजूंनी ज्येष्ठ नागरिक संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन दोन्ही क्लब मार्फत करण्यात आले आहे. दोन्ही क्लब मार्फत, हा रुग्ण जेष्ठांसाठी कायमस्वरूपी संयुक्त उपक्रम राहणार असून भविष्यात त्यात अधिक रुग्ण साहित्याची भर पडत जाणार आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
swt126.jpg
10225
विजयदुर्ग : येथील परिसरातील माळरानावर वणवा लागला.
विजयदुर्ग परिसरात
माळरानावर आग
देवगड, ता. १२ः तालुक्यातील विजयदुर्ग परिसरातील माळरानावर गुरुवारी (ता.११) लागलेल्या आगीत जवळपासच्या आंबा कलम बागांनाही झळ बसली. वाळलेले गवत आणि वारा यामुळे आग पसरुन नुकसान झाले. पावसाळ्यानंतर वाळलेल्या गवतामुळे वणवे पेटण्याचे प्रकार घडतात. यामुळे माळरानावरील गवताला लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने पसरते. त्यामुळे परिसरातील आंबा बागायती पर्यंत आग पसरुन नुकसानीची तीव्रता वाढते. विजयदुर्ग पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्याचे सांगण्यात आले.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.