swt129.jpg
10246
पानवळ ः येथे शेतीपाट कामाच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.
शेतीपाट कामाचे पानवळ येथे उद्घाटन
बांदा, ता. १२ः येथील ग्रामपंचायतीतर्फे पानवळ येथे पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत असलेल्या शेतीपाट कामाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात झाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ रामकृष्ण पेळपकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी उपसरपंच राजाराम धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, साईप्रसाद काणेकर, दीपलक्ष्मी सावंत, माजी सरपंच गुरुनाथ धारगळकर, बाळा आकेरकर, शेखर हडपडकर, राजू गोवेकर, सिद्धेश डेगवेकर, ठेकेदार श्री तारी यांसह ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीपाट कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुधारणेसह शेती व्यवस्थापनात मोठी सोय होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.