कोकण

आजगावात १९ पासून ‘दीपोत्सव’

CD

आजगावात १९ पासून ‘दीपोत्सव’

विविध स्पर्धा; सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १२ : आजगाव ग्रामस्थांतर्फे १९ आणि २० ला ‘दीपोत्सव २०२५’ चे आयोजन केले आहे. या दोन दिवसांत विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. केंद्र शाळा आजगाव क्रमांक १ आणि (कै.) नरहरी उर्फ बाब्या पांढरे रंगमंच, आजगाव येथे स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
पहिल्या दिवशी, १९ ला सायंकाळी पाचला पारंपरिक फुगडी स्पर्धेने कार्यक्रमांची सुरुवात होईल. आजगाव, धाकोरे, भोमवाडी, शिरोडा, आरवली, तिरोडा आणि मळेवाड या गावांपुरती ही स्पर्धा मर्यादित असून, विजेत्यांना प्रथम २,०००, द्वितीय १,५०० आणि तृतीय १,००० अशी रोख पारितोषिके आहेत. त्याच दिवशी आजगाव पंचक्रोशी मर्यादित मोठ्या गटासाठी (वय १३ वर्षावरील) रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून, १० स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम ठरणाऱ्यांना २,०००, १,५०० आणि १,००० अशी अनुक्रमे रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येतील. २० ला सायंकाळी चारला पाककला स्पर्धा आयोजित केली असून, आजगावपुरत्या मर्यादित या स्पर्धेत मूग किंवा मूगडाळपासून तिखट पदार्थ आणि दुधापासून गोड पदार्थ तयार करण्याचे दोन प्रकार असतील. एका स्पर्धकाला दोन्ही प्रकारात भाग घेता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी गृहपयोगी वस्तूंची बक्षिसे दिली जातील.
सायंकाळी सहाला लहान गटासाठी (वय ५ ते १२ वर्षे) रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून, १० स्पर्धकांमध्ये रोख रक्कम व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येतील. यानंतर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आजगाव पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेत लहान गट (वय ८-१५ वर्षे) आणि मोठा गट (वय १६ वर्षांवरील) असे दोन विभाग असतील. दोन्ही गटांमध्ये १० स्पर्धक सहभागी होणार असून विजेत्यांना अनुक्रमे २,०००, १,५०० आणि १,००० अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान केली जातील. याशिवाय, दीपोत्सवातील विशेष आकर्षण म्हणून पैठणी स्पर्धेचे आयोजन केले असून, विजेता व उपविजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ज्या स्पर्धकांना या विविध स्पर्धांत सहभागी व्हायचे आहे त्यांनी १८ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT