कोकण

‘शिक्षकांचे वेतन कपात होणार नाही’

CD

‘शिक्षकांचे वेतन
कपात होणार नाही’
तळेरे ः शाळा बंद (५ डिसेंबर) आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी काढला होता. याचा तीव्र निषेध शिक्षक संघटनांकडून करण्यात आला. हा आदेश घटनात्मक अधिकारांना बाधक असल्याचे नमूद करून तो तातडीने रद्द करण्याची मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केले. त्यावर उत्तर देताना शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांनी वेतन कपात रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, ‘विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक एक दिवस अतिरिक्त अध्यापन करतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
------
बागायतदार संघटनेची
वेंगुर्लेत २२ ला सभा
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेची खास सभा २२ ला सकाळी अकराला वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोकण हापूस या नामांकनामुळे आपल्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागातील हापूस आंबा देशात व जगात भौगोलिक नामांकनानुसार नावलौकिक आहे. कोकण हापूसला बदनाम करण्यासाठी गुजरातचे वलसाड हापूस नामांकनसाठी षड्यंत्र सुरू झाले आहे. याला संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे, यावर चर्चा होणार आहे. प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे व इतर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या सभेत होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेने केले आहे.
---
श्रावण येथे आज
धार्मिक कार्यक्रम
आचरा ः येथील सहा आसनी मॅजिक रिक्षा संघटना कणकवली आचरा रोडतर्फे उद्या (ता.१३) मारुती मंदिर श्रावण येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सकाळी दहाला सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची सुस्वर भजने, रात्री दहाला कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर प्रस्तुत अतिकाय दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------------
आंबेगाव येथे
१६ ला जत्रोत्सव
सावंतवाडी ः आंबेगाव येथील देव क्षेत्रपाल देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव १६ ला होणार आहे. रात्री पालखी मिरवणूक, खानोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. या लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रपाल देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, सचिव प्रकाश केळुसकर, मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT