कोकण

-ग्लुकोज लेव्हल डिटेक्टर प्रतिकृती प्रथम

CD

लांजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन------लोगो

‘ग्लुकोज लेव्हल डिटेक्टर’ प्रतिकृती प्रथम
चिराग, निनादची निर्मिती; श्वेता सावंतना तृतीय क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ ः लांजा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा, खावडी यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. प्राथमिक विभागातून ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील चिराग पाटोळे व निनाद माने यांनी सादर केलेल्या ‘ग्लुकोज लेव्हल डिटेक्टर’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अध्यापकनिर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्राथमिक विभागात श्वेता सावंत यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विभाग प्रतिकृती स्पर्धेत श्रीराम लांजेकर व विक्रम चव्हाण तर विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेत समीक्षा बेंद्रे, जान्हवी दरडे यांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रशालेच्या विद्यार्थिनी गायत्री दरडे व जान्हवी घाणेकर यांनी प्रतिकृती तयार करण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना विज्ञान विभागप्रमुख स्वरा वासुरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, शाळा समितीचे अध्यक्ष नामदेव पाटोळे, सदस्य विजय पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman : तारिक रहमान - डार्क प्रिन्स, भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास, मृत्यूदंडाची शिक्षा, लंडनला पलायन अन् आता बांगलादेशचे संभाव्य पंतप्रधान!

T20 World Cup : यूएईचा थरारक विजय अन् अफगाणिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप जवळपास निश्चित! ड गटात मोठी उलथापालथ

Mumbai Goa: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम कधी पूर्ण होणार? नवीन तारीख आली समोर

IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?

मंत्र्याने दिलेल्या घराची कॉन्ट्रोव्हर्सी ते लॉकडाउनमध्ये केलेलं लग्न; मराठमोळी सोनाली कुलकर्णी सध्या कुठे गायब आहे?

SCROLL FOR NEXT