कोकण

नेरुर रुग्णालयात उद्यापासून निवासी श्रमसंस्कार शिबिर

CD

नेरुर रुग्णालयात उद्यापासून
निवासी श्रमसंस्कार शिबिर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रात येथे १५ ते २१ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
सोमवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते, तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्रा. कल्पना भंडारी, उपसरपंच दत्ताराम म्हाडदळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये प्रा. अरुण मर्गज, तृप्ती प्रभूदेसाई, प्रा. सिद्धी पाताडे, डॉ. गार्गी ओरोसकर, प्रमोद काळसेकर, कल्पना भंडारी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
‘भारताच्या शाश्वत विकासासाठी तरुणांचे सक्षमीकरण’ ही थीम असलेल्या शिबिर कालावधीमध्ये ग्रामसफाई, धार्मिक स्थळांची स्वच्छता, विविध बौद्धिक चर्चासत्रे, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव असणार आहे. नेरुर ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे संयोजक प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. मानसी धुरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT